Funny Marathi Ukhane



इराण्याच्या चहा बरोबर मिळतो मस्का पाव 
****
रावांची बाहेर किती लफडी ते विचारू नका राव !!


चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ 

श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा,
....
ना आवडतो गरम गरम बटाटेवडा

पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,
....
आहेत आमचे फार नाजुक


धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा,
.....
च्या जीवावर करते मी मजा.

अत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड 
***** हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड्



जीवन आहे एक अनमोल ठेवा,
......
आणतात नेहमी सुकामेवा

सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे,
.....
ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे.



कॉरव-पांडव युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी,
......
आहेत फार निस्वार्थी 


चान्दिच्या ताटाला चन्दनाचा वेढा
मी आहे म्हैस तर तो आहे रेडा


इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
...
घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!! 


भल्या पहाटे करावी देवाची पुजा ,
...
च्या जीवावर करते मी मजा



सुंदर सुंदर हरीणाचे ईवले ईवले पाय,
आमचे हे अजुन कसे नाही आले ,
गटारात पडले की काय ?


वड्यात वडा बटाटावडा,
...
मारला खडा
म्हणून जमला आमचा जोडा.


सकाळी सकाळी बागेत तोडत होते क ळ्या
….
रावांचे दात म्हणजे दुकानातल्या फळ्या

चांदीच्या किचन मध्ये सोन्याच्या ओटा
XXXX
चे नाव घेते, केसात माझ्या हजार पाचशेच्या नोटा
निळे निळे डोंगर आणि हिरवे हिरवे रान
XXXX
रावांचा आवडता छन्द म्हणजे सतत मदिरापान

सप्तपदीच्या या वाटेवर मी नेहमीच तुला साथ देईन
तुझ्यासाठी एखादा शर्ट घेताना माझ्यासाठीही दोन साड्या आणि चार ड्रेस घेईन
पौर्णिमेच्या चंद्राची वाट पाहते रजनी
….
चे नाव घेते मी त्यांची साजणी
अंगणात लावली फुलझाडे, कुंडीत लावली तुळस
….
चे नाव घ्यायला कसला आलाय आळस?

तेलाच्या दिव्याला तुपाची वात
XXXX
रावांशी केले लग्न, आता आयुष्याची वाट

काश्मीरहून आणलाय रेशमी सुंदर रुमाल
….
बरोबर असले की हवाय कशाला हमाल

एक होती चिऊ एक होती काऊ, …. चे नाव घेते , डोक नका खाऊ
लग्नाच्या पंक्तीत घेतला उखाणा खास, अन …. च्या घशात अडकला घास
रेशमी सदर्याला प्लास्टीकचे बक्कल, …. ना आहे टक्कल, पण डोक्यात नाही अक्कल

टिप्पण्या